हिवरखेड येथील शेतकऱ्यांचा एक बैल लम्पि आजाराने दगावला,गावातील व परिसरातील पशुपाल्यांनि जनावरांची काळजी घेणे गरजेचे,


 अर्जुन खिरोडकार/प्रतिनिधी हिवरखेड...

हिवरखेड येथील ऐका शेतकऱ्याचा बैलं लम्पि आजाराने दगावल्याची घटना १९ सप्टेंबरला घडली, शेतकरी सोहेबअली मीरसाहेब या शेतकऱ्याच्या एका महागळ्या बैलाचा मुत्यू झाला,  लम्पि आजार हा वाऱ्यासारखा ग्रामिण भागात पसरत आहे, शेतकऱ्यांनि लम्पि ईजक्शने तात्काळ आपल्या गुरांना द्यावे गुरांना या आजारापासून मुक्त करण्यासाठी  शासनाने यावर मात करायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांन कडून व्यक्त केली जात आहे,तसेच जे गुरे लम्पि आजाराने दगावले जात आहेत ,त्यांना शासनाच्या वतीने मदत जाहीर केली जात आहे, त्याकरिता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती द्यावि व ग्रामपंचायतने सुद्धा पशुवैद्यकीय डॉक्टराना सोबत घेऊन या बाबत पंचनामा करून मुतक जनावरांच्या मालकाला मदत मिळवून देण्यास सहकार्य करावे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली, लम्पि आजाराने हिवरखेड येथील शेतकरी मुन्नाभाई मीरसाहेब या शेतकऱ्यांनचा बैल दगावला या घटनेची ग्रामपंचायत हिवरखेडने व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून लवकरच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीने घोषित केली जाईल तसेच लम्पि आजारापासून पशुप्रेमी,पशुपाल्यानि जनावरांची काळजी घ्यावी असे आव्हान  हिवरखेड पशुवैद्यकीय  अधिकारी व ग्रामपंचायत हिवरखेडच्या वतीने करण्यात आले,

Previous Post Next Post