हिवरखेड येथील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.कोरोनानंतर सावरलेले जीवनमान या विषयावर आधारित या निबंध स्पर्धेत २०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.यामध्ये श्री अंबिकादेवी विद्यालय सौन्दळाची विद्यार्थिनी कु.उन्नती दिनेश खंडेराव हिने प्रथम तर कु.चतुर्थी श्रीकृष्णराव हागे व कु.श्रावणी संतोष भगत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.या निबंध स्पर्धेत प्रथम बक्षिस १००१ रु.सुखकर्ता मेन्स वेअर व प्रेमाचा चहा यांच्यातर्फे ,द्वितीय बक्षिस ७०१ रु.स्व.ललिता नरेश निळे यांच्या स्मरणार्थ अंकुश निळे यांच्यातर्फे तर तृतीय बक्षिस ५०१ रु.ऍड.कौंतेय श्यामशील भोपळे यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते.सर्व स्पर्धकांनी स्वहस्ताक्षरात लिहून अतिशय सुंदर निबंध पाठवले होते.ही निबंध स्पर्धा पार पाडण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच तेल्हारा तालुक्याचे विशेष सहकार्य लाभले होते.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनसुवर्ण प्रतिष्ठानचे दिलीप लोणकर,संदीप लोणकर,प्रथमेश लोणकर,गोकुळ हिंगणकर,श्रेयश लोणकर,वैभव पोटे,मनोज भगत,अनुज मानकर,शिवा ओंकारे,हर्षल पोटे,श्रीकृष्ण मानकर यांनी परिश्रम घेतले. आयोजकांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले असून सहभागी स्पर्धकांचे आभार मानले. तर सरस्वती उच्च महाविद्यालयात शाळेचे मुख्यध्यापक भोंगळे सर, धर्माळे सर, कवळकार सर, वैल्कर सर, व पत्रकार अर्जुन खिरोडकार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले,,
मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर...कु.उन्नती खंडेराव प्रथम तर कु.चतुर्थी हागे व कु.श्रावणी भगत अनुक्रमे द्वितीय व तृतीय...
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
