जळगाव जामोद येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेचे दिनांक एक ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते. या मेळाव्याला शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ पाणीपुरवठा मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार प्रतापराव जाधव शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट शांताराम दाणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी जळगाव जामोद येथे आले होते. यादरम्यान मेळाव्यामध्ये काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत जळगाव जाऊन पोलिसांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगाव जामोद तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना जळगाव पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले होते. शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ हे मंत्री गुलाबराव पाटील शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच जळगाव जामोद तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा करिता निषेध करणार होते. परंतु यापूर्वीच पोलिसांनी जळगाव जामोद तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले.शिवसेना तालुकाप्रमुख यांनी शिवसेना शिंदे गटावर तीव्र शब्दात टीका केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ, उप तालुका प्रमुख मुस्ताक भाईजान, वाहतूक सेनेचे गणेश धुळे, शहर प्रमुख रमेश ताडे, युवा सेना तालुका प्रमुख विशाल पाटील, विधानसभा संघटक संकेत रहाटे, शिवसेना उपशहर प्रमुख मंगेश कातोरे, चांद कुरेशी, युवा सेना शहर प्रमुख गोपाल ढगे, पवन वाघ पवन अवचार शेख अनिस युवराज देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना जळगाव पोलीसांनी स्थानबद्ध केले होते.
मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सभेपूर्वी जळगावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध..
जळगांव जा.प्रतिनिधी:-
