खेर्डा बु.ग्रामपंचायत च्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे संजय म्हसाळ यांची निवड...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव(जामोद) तालुक्यातील बहुचर्चित अशा खेर्डा बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच पदाच्या दिनांक ३० सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे संजय म्हसाळ यांची सरपंचपदी निवड झाली. संजय जानराव म्हसाळ यांना सहा सदस्यांची मते पडली तर त्यांच्या विरोधक मनकरनाबाई पिंपळकर यांना पाच सदस्यांची मते पडली.नरेश वानखडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद हे रिक्त झाले होते.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सरपंच व्हावा यासाठी माजी सभापती प्रवीण भोपळे पूर्णाजी वानखडे,उमेश राठी,प्रभूदास बंबटकार,निशीकांत देशमुख,पांडुरंग भोपळे,राजाराम इंगळें,रमेश प्रधान,अनिल,देऊळकार, मुरलीधर जाधव,प्रभुदास, बंबटकार, मारोती वानखडे दिपक बंबटकार,प्रदिप भोपळे, गजानन उगळकार,रविद्र भोपळे, ज्ञानदेव राजनकार, दिलीप म्हसाळ, नितीन जाधव , राधेश्याम वाकेकर,दिपक जाधव, निलेश बंबटकार,, विलास बंबटकार,सुपडाजी देऊकार, गजानन मसुरकार,राजु तायडे, अमोल रमेश वानखडे,राजु मसुरकार, नारायण उमरकर, विश्वनाथ म्हसाळ, गजानन म्हसाळ,भारत सातव, तुकाराम सातव,शालीग्राम खिरोडकार, मनोहर उगळकार, सुभाष वासनकार, सचिन उगळकार, प्रदीप वानखडे, स्वप्निल जाधव,अक्षय करे, दिपक राजुस्कर,, दिनेश वानखडे आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रसंगी माजी संरपच व ग्रा.प.सदस्य नरेंश वानखडे , उपसरपंच सौ.दुर्गाताई म्हसाळ, सदस्य संतोष बंड,सौ.योगिताताई भोपळे यांचे महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.

Previous Post Next Post