राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जळगाव जामोद नगर शाखेचा विजयादशमी उत्सवात निमित्त दि.६ ऑक्टोबरच्या दुपारी चार वाजता शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेले गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन लक्षवेधक ठरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव जामोद च्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. ६ ऑक्टोबरला करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी दुपारी चार वाजता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातून पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांचा पथसंचलनाला प्रारंभ झाला . शहरातील दुर्गा चौक, चौभारा चौक,मानाजी चौक , जुना भाजीबाजार , चावडी व पोलिस स्टेशन या प्रमुख मार्गावरून जाऊन पुन्हा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कॉलेजच्या प्रांगणापर्यंत पथसंचलन काढण्यात आले .पथसंचलन मार्गावर रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून शहरातील नागरिकांनी स्वयंसेवकांचे स्वागत केले .स्वयंसेवकांच्या पथसंचलनात सुरवातीला फुलांनी सजविलेल्या रथावर भारतमाता , आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.घोषपथक, दंडधारी स्वयंसेवक व स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन लक्षवेधत होते.
जळगाव शहरातील गणवेशधारी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन ठरले लक्षवेधक...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
