नऊ वर्षांपूर्वी रामदेव नगर येथे राहणाऱ्या देविदास डाबेराव या शिक्षकाच्या घरात दिनांक 15 ऑक्टोबर 2013 रोजी रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून शंभर ग्रॅम सोने त्यावेळेस चोरून नेले होते. पोलिसांनी कार्य तत्परता दाखवत सदर आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. सदर चोरट्यांनी एका सराफा व्यावसायिका जवळ ते सोने वितळून त्याची एक सळई बनवली होती. ती सोन्याची सळई नांदुरा पोलिसांनी जप्त केली होती. सदर शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. सोने चोरणाऱ्या मध्ये जळगाव जामोद येथील दोन आरोपी होते त्यामध्ये निलेश जाधव व ओमप्रकाश जाधव दोन्हीही खेर्डा वेस येथील व एक आरोपी शेख जिया शेख रोशन हा नांदुरा येथील होता सदर पोलिसांनी तीनही आरोपींना जेर बंद केले होते व ती केस अद्यापही सुरूच आहे. सदर चोरी गेलेले सोने हे न्यायालयामध्ये जमा करण्यात आले होते. ते सोने शिक्षक देविदास डाबेराव यांना मिळावे याकरिता जळगाव जामोद पोलिसांनी सरकार तर्फे से जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर व त्यांचे सोबती हेड मोहरर सोळंके,कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार यांनी सादर केला होता. त्यामुळे न्यायालयाने सुपूर्त नाम्याने सदर शिक्षकास त्यांचे चोरी गेलेले सोने जळगाव जामोद पोलिसांना दिले व दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पंचासमक्ष सेवानिवृत्त शिक्षक देविदास डाबेराव यांना शंभर ग्रॅम सोन्याची सळई किंमत अंदाजे पाच लक्ष रुपये दिली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक यांना त्यांचे चोरी गेलेले सोने मिळाल्याने अतिशय हर्ष झाला. त्यांनी सोने मिळाल्याबद्दल न्यायालयाचे व विशेषता जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या सर्व टीमचे यावेळी आभार मानले. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक माजी नगरसेवक निलेश शर्मा,आर,सी 24 न्युजचे संपादक राजेश बाठे,लियाकत खान, अनिल भगत, यांची यावेळी उपस्थिती होती.
नऊ वर्षांपूर्वी चोरी गेलेले सोने दसऱ्याला जळगाव जामोद पोलिसांनी शिक्षकास सुपूर्द केल्याने शिक्षकाने मानले आभार...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
