उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांचा जलंब पोलीस स्टेशन मध्ये नागरी सत्कार...


 सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जलंब येथील पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी जलंब पोलीस स्टेशन व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने खामगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कोळी साहेब यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.खामगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी हे गेल्या दोन वर्षापासून खामगाव उपविभागात आपला कार्यभार पाहत होते त्यांनी आपल्या कार्यकाळात खामगाव व परिसरात शांतता व सुव्यवस्था चोख ठेवली होती त्यामुळे त्यांनी सदनिक्रय खलनिग्राय हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले आहे त्यांनी वेळोवेळी जलंब पोलीस स्टेशन व परिसरातील गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन योग्य असे मार्गदर्शन व सहकार्य केले.या नागरी सत्काराला ठाणेदार धीरज बांडे,  माजी अर्थ व बांधकाम सभापती सुरेश वनारे, सरपंच श्रीकांत तायडे, माजी सरपंच बबलू देशमुख, महादेव सोनटक्के, धामणकार गुरुजी, शेख मेहबूब शेख गुलाब, शेख सुलेमान शहा उस्मान शहा, हरिओम तायडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post