शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा जिंकून जळगाव (जामोद) च्या विद्यार्थ्यांची विभागावर निवड झाली आहे.बुलढाणा येथील क्रिडा संकुलात दिनांक- १४/११/२०२२ रोजी झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत उत्तम कराटे टुर्नामेन्ट फाईट खेळून प्रतिस्पर्धी खेळाडूंवर आपल्या वय आणि वजन गटात प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळविले. यामध्ये कु.सई मनोज वाघ, विवेक किरण गोलाईत यांनी १४ वर्ष वयोगटात तर मिर्झा मुसेब बेग आणि ओम तुळशीराम पाचपोर यांनी सतरा वर्ष वयोगटात विजय प्राप्त केला.या सर्व विद्यार्थ्यांची शालेय विभागिय कराटे स्पर्धेकरीता निवड करण्यात आली.विजयी यशप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय मुख्य कराटे प्रशिक्षक सेेन्साई राजेंद्रकुमार आटक सरांना दिले.विभागस्तरावर निवड झालेल्या विजयी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर सई मनोज वाघ हिच्या विभागस्तरावरील निवडीबाबत जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सईच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले. तर भारत जोडो यात्रेनिमित्त जळगांव जामोद येथे आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश काँग्रेस सचिव तथा दिशा बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनीही भेटीदरम्यान सई मनोज वाघ हिचे भरभरून कौतुक केले.
कुमारी सई मनोज वाघ हिची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत विभाग स्तरावर निवड निवडीचे मान्यवरांनी केले कौतुक...
जळगांव जा.प्रतिनिधी:-