टीटंबा येथें भाजपच्या वतीने बिरसापर्व साजरा...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

धारणी तालुक्यातील टीटंबा येथें माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात व रमेश मावस्कर, सौं रेखाताई मावस्कर, व अनुसूचित जिल्हाध्यक्ष सुखदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने भव्य बिरसा पर्व साजरा करण्यात आला.देशाचे  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून टीटंबा ता.धारणी येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने मोती माता मंदिराच्या सभागृहात धरती आबा,महान क्रांतिकारक आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार प्रभूदास जी भिलावेकर यांनी संबोधित केले.कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माजी उपायुक्त रमेशजी मावस्कर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सौ.रेखाताई मावस्कर,अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुखदेवजी पवार,जिल्हा सरचिटणीस साबूलालजी दहिकर,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालालजी मावस्कर,सुभाषजी गुप्ता,नालमवारजी,तिलकजी पटेल,मनिशजी पांडे,महेंद्र धांडे,तुळशीराम बेठेकर आदी सरपंच व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post