धारणी तालुक्यातील जुटपाणी तलावाच्या कॅनल चे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून कामात प्रचंड अनिमितता दिसून येत आहे। टेंभली गावातील वीरेंद्र पांडे यांच्या शेताजवळील कॅनलचे कामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असून कॅनल व पुलाचे बांधकाम किती दिवस टिकणार असे प्रश्न शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळावे म्हणून तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी लहान मोठ्या कॅनलचे काम सुरू आहे सदर कामावर अभियंत्याचे दुर्लक्ष असून निकृष्ट साहित्याचा वापर या कामांमध्ये होत आहे विशेष म्हणजे कॅनलचे काम करत असताना सिमेंट काँक्रीट अगोदर त्या ठिकाणी गिट्टी किंवा मुरूम टाकून धुममस किंवा दबाई करणे आवश्यक असते या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचे धुमस किंवा दबाई न करता पाण्यातच मातीवर सिमेंट काँक्रीट टाकल्या जाते विशेष म्हणजे एकदा कॅनल बांधून झाल्यानंतर त्यावर क्युरिंग म्हणून पाणी टाकण्याचे सौजन्य सुद्धा संबंधित ठेकेदार दाखवत नाही सदर कामात वापरलेली गिट्टी रेती ही माती मिश्रित असून सिमेंट सुद्धा कालबाह्य झाल्याचे दिसून येते त्यामुळे सदरचा कॅनल हा किती दिवस टिकाव धरणार असा प्रश्न आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्र स्टेट लघु सिंचन व पाटबंधारे विभाग धारणी तर्फे सदर काम सुरू असून या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे
जूटपाणी तलावाच्या कॅनलचे कामात नित्कृष्ट साहित्याचा वापर..महाराष्ट्र राज्य सिंचन व पाटबंधारे उपविभाग धारणी चा उपक्रमकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..