धारणी तालुक्यातील काटकुंभ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत शाळेत ढुलकत ढुलकत उपस्थित राहत असल्यामुळे भागातील आदिवासी शिक्षण सेवा कोलमडली पडली असुन नशेबाज शिक्षकांमुळे आदिवासी विध्यार्थांच्या शैक्षणिक जिवनावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काटकुंभ येथिल मुख्याध्यापक अविनाश राजनकर आज दारूच्या नशेत शाळेच्या वेळत झोपलेल्या अवस्थेत आढळले. अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत निवासस्थाने नाहीत, करमणुकीचे कोणतीही साधने नाहीत. म्हणून विध्यार्थांना विद्या दानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक खुप बिकट अवस्था झाली असुन संपुर्ण पाच सात शाळेचा कारभार सोडला तर जवळपास सर्वच शाळेत एक दोन शिक्षक मोहा दारूचा आस्वाद घेत विध्यार्थांचे शिक्षण उध्वस्त करीत आहे. मेळघाटातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ऐन शाळेच्या तासात काटकुंभ येथिल मुख्याध्यापक अविनाश राजनकर चक्क दारूच्या नशेत झिंगाट झालेल्या अवस्थेत पडून असल्याचे गावकर्यांना दिसताच भ्रमणध्वनीने चित्रण करून वाटशाँपवर व्हायरल केल्यामुळे संपुर्ण शिक्षण क्षेत्राला शरमेने मान खाली घालावी लागली. अनेक शिक्षक आपल्या स्वतःच्या मुलांच्या उज्वल भविष्य घडविण्यासाठी आपल्या राहत्या घरून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत शिक्षणाचे डोस पाजत आहे.तसेच शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षचा मेळघाटातील शाळेवर लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मेळघाटात शिक्षणाचा फजां...धारणी तालुक्यातील शिक्षण विभाग कुंभकर्णाच्या झोपेत...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी