स्थानिक बापुमीया सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुलामध्ये दि.26नोंव्हेबर रोज शनिवार ला संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. सलिमजी पटेल साहेब , सहसचिव श्री रब्बानी देशमुख सर ,संचालक प्रा. कय्युम पटेल सिराजोद्दीन पटेल व प्राचार्य डॉ. आय. ए. राजा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. संदीप उगले यांची उपस्थिती लाभली,तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद इंगळे यांची उपस्थिती होती.सुरुवातीला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्लन करून पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले.त्यानंतर भारतीय संविधानातील उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.त्याबरोबर 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.किशोर गवई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अॅड. संदीप उगले यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे घरोघरी वाचन झाले पाहिजे तसेच संविधान सप्ताहाचे आयोजन करून भारतीय नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जाणीव जागृती करावी असे आवाहन केले.सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा.अॅड सलीमजी पटेल साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून महिन्याचा शेवटचा शनिवार हा My staurday म्हणून साजरा करण्यात येतो त्या निमित्त आज संविधान दिनाचे औचित्य साधुन देशभक्ती पर गीत व संविधान गौरव गीते विद्यार्थ्यांनी सादर केले त्यामध्ये प्रामुख्याने कु. अश्विनी अवचार, साक्षी गवई,साक्षी बांगर, तेजल कवळे,मुक्ता परमाळे इ. विद्यार्थीनींनी संविधान व देशभक्तीपर गीते सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहिद पठाण यांनी मानले कार्यक्रमासाठी उपप्राचार्य शेख वाहिद, उपप्राचार्य डॉ.चेतन पलन, उपप्राचार्य डॉ. नूर मोहम्मद, प्राचार्य तृप्ती भोपळे,यांच्या सह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
बापुमीया सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुलामध्ये "संविधान दिन" साजरा...
जळगांव जा प्रतिनिधी:-