दारूची बॉटल द्या मग करतो उपचार हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे सदर व्हिडीओ मध्ये जो डॉक्टर दिसत आहे त्यावरून हा व्हिडिओ मेळघाटातील सलोना आरोग्य केंद्रातील आहे यापूर्वी अनेकदा या आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस आला आता पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलं आहे सदर व्हिडीओ मध्ये नागरिक नशेत चुर असलेल्या डॉक्टरांना जाब विचरतांना दिसून येत आहे त्यामुळे आता आरोग्य विभागाचे जिल्हा प्रमुख काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना येथील डॉक्टरांचा दारूची बॉटल द्या मग करतो उपचार हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हीडीओ मध्ये डॉक्टर दारूच्या नशेत चुर असल्याचे दिसून येत आहे तर काही नागरिक डॉक्टरांना धारेवर धरताना दिसून येत आहे सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच मेळघाटच्या आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच आठवड्यात कधीही तुकाराम मुंडे मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहे अशातच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोग्य विभागात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे गंभीर बाब म्हणजे यापूर्वी सुद्धा या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघडकीस आले आहे मात्र आता पुन्हा एकदा या आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे व्हिडिओ मधील दिसून येत असलेले डॉक्टर हे सलोना आरोग्य केंद्रातील आमझरी उपकेंद्रात सामुदायिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे मात्र ते नेहमी सलोना केंद्रात किंवा अमरावती येथे राहत असल्याचे अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान निदर्शनास दिसून आले विशेष म्हणजे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सुद्धा त्यांना पाठीशी घालतांना दिसून येते मात्र आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोग्य विभागाचे जिल्हा प्रमुख काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
--प्रतिक्रिया--
....सदर व्हिडीओ संबंधित डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे मात्र त्या व्हिडिओ मधील अन्य उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी बाकी आहे ती लवकरच करण्यात केली जाईल त्यानंतर निर्णय घेण्यात येईल :-डॉ सतीश प्रधान,तालुक्का वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा
