भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील शासनाने चिखलदरा नंदनवनातील" स्कायवाक" च्या कामाला दिली हिरवी झेंडी...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

चिखलदऱ्याचं वैभव वाढविणाऱ्या स्कायवाकच्या  पॉईंटला शेवटी कामाला सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले जवळपास तीन वर्षाच्यापूर्वी स्कायवाकच्या दोन पीलर्सचे काम वनविभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे कामाला स्थगिती आली होती दोन वर्षाचा कोविड विलंब आणि एक वर्ष राजकीय विजनवास यामुळे  प्रशासकीय हालचालीना  स्थगिती आली होती नंतर येथील जनतेच्या आग्रही मागणीवरून  राज्य शासनाने या कामाला सुरुवात करण्याचा ठोस  निर्णय घेतला आणि तो मेळघाटच्या जनतेसाठी हिताचा ठरला मेळघाट मधील दारिद्र्य कुपोषण आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारीने जनता त्रस्त  सोबत चाराटंचाई  कोविड व  लंपी  सारख्या दुर्धर  आजाराने सर्वत्र अस्वस्थता पसरली होती त्यातूनच रोजगारासाठी सैरवर झालेली स्थानिक  जनता रोजगार मिळेल तेथे लहान मुलांचं शिक्षण  आणि म्हाताऱ्यांचं संगोपन ह्या महत्त्वाच्या बाबी  वाऱ्यावर सोडून वीतभर पोटासाठी भटकंती करीत आहे त्याचा परिणाम स्थानिक जनतेच्या विकासावर होत आहे  रोजगाराच्या अगतिकतेमुळे  आर्थिकशोषण  सोबतच लैंगिक अत्याचाराची परिसीमा  ओलांडल्या जात असून छळ आणि अन्याय  मुकाट  सहन केल्या जातो आहे या सर्व बाबीवर माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक  प्रशासन मूग गिळून का आहे? हाही प्रश्न येथील जनतेला आणि हतबल लोकप्रतिनिधींना  पडलेला आहे.म्हणूनच एकंदरीत दि. 26 नोव्हेंबर 2022 ला भारतीय संविधान दिनी या स्कायवाकच्या पॉईंटला भेट दिली असता येथील विद्यार्थ्यांच्या पर्यटकांच्या व्यावसायिकांच्या स्थानिक तरुणांच्या प्रभावी मुलाखती ऐकून आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या मेळघाटचा मानाचा तुरा होण्यासाठी आणि या काचेच्या घरात बसून दरी खोऱ्यातलं खूप खोल खोल जाणारं मेळघाटच सौंदर्य पर्यटकांना जवळून  दिसावं रोजगारासाठीच स्थलांतर थांबावं पर्यटकांची संख्या वाढावी विद्यार्थ्यांच्या सहली निघाव्या येथील व्यवसायिकांना आणि तरुणांना सुगीचे  दिवस यावेत  रोजगाराची संधी म्हणून स्कायवाकचे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा तात्काळ उभारणीचा निर्णय घेतला त्याबद्दल  सुखदेव पवार जिल्हाध्यक्ष  भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अमरावती ग्रामीण यांनी सरकारचे अभिनंदन! केले आहे

Previous Post Next Post