विठ्ठल बहुदेशीय सेवाभावी संस्था द्वारा संचालित हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुटाळा (बु.) खामगाव येथे तंत्र प्रदर्शनी २०२२-२३ दि. ३०/११/२०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून करण अग्रवाल डायरेक्टर ऑफ चिरायू पावर प्रा. लि. खामगाव तसेच महावितरण कंपनीचे इंजिनिअर बहुरूपे साहेब, जय गजानन इजिनिअरिंग वर्क चे डायरेक्टर सुनील मापारी उपस्थित होते व संस्थेचे अध्यक्ष जनार्दन हेंड पाटील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेचे सचिव हर्षद हेंड पाटील,चेतन हेंड पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले.सदर प्रदर्शनी मध्ये संस्थेतील सर्व व्यवसायातील प्रशिक्षानार्थ्यानी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.कोपा व्यवसायातील मुलामुलींनी संगणकावर उत्तम प्रात्यक्षिक करून दाखवले.वेल्डर व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यानी वेल्डिंग टेक्निक,होमे मेड गस वेल्डिंग मशीन जोडारी व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यानी टेक्निकल पंचिंग मशीन टूल व वीजतंत्री व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी एअर मिसाईल वाटर टाकी आलाराम असे प्रकल्प बनवले होते. तसेच या प्रदर्शनीमध्ये आलेल्या सर्व माण्यवरांच्या प्रशिक्षानार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट चे निरीक्षण करण्यात आले. केले. प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षानार्थ्याचे खूप प्रशसा केली व संस्थेचे प्राचार्य अंकित जैस्वाल व संस्थेचे सचिव मा. हर्षद हेंड पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाला संधाता ट्रेड चे निदेशक अनिल तेलगोटे, वीजतंत्री ट्रेड चे निदेशक गौरव फुंडकर, जोडारी ट्रेड चे निदेशक आकाश मरापे, कोपा ट्रेड चे निदेशक सुधाकर निंबाळकर व लिपिक शुभम चंभाटे तसेच इत्यादी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हर्ष आय. टी. आय. सुटाळा बु, खामगाव येथे तंत्र प्रदर्शनी मोठ्या उत्साहात संपन्न...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-