नीमकराड येथील ६० वर्षीय कैलास वावरे ह्या शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील निमकराड येथील रहिवासी असलेले कर्जबाजारी शेतकरी कैलास दशरथ वावरे वय ६२ वर्ष हे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान शेतात काम करीत असताना पत्नीला कुऱ्हा येथे बाजार आणायला जातो असे सांगुन शेतातून निघून गेले व संध्याकाळपर्यंत घरी पोहोचलेच नाहीत, सगळीकडे शोधाशोध केली असता ते मिळून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी शोध घेत असताना निमकराड शिवारातील शेतामध्ये कैलास वावरे हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. नातेवाईकांनी संबंधित घटनेबद्दल गावचे पोलीस पाटील रामधन मोरे यांना फोन करून सांगितले कैलास दशरथ वावरे हे निमकराड शिवारांमधील शेतात झाडाला फाशी घेतलेल्या स्थितीत मिळाले आहेत. पोलीस पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला माहिती दिली घटनास्थळी जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार पोलीस कॉन्स्टेबल विनोद इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून जळगाव पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केला आहे. कैलास वावरे यांचेकडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया संग्रामपूर शाखेचे 90 हजार रुपये कर्ज थकीत आहे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे आत्महत्या का केल. मृतक शेतकऱ्यास,पत्नी, तीन मुले, एक विवाहित मुलगी असा आप्तपरिवार आहे.  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडस्वार करीत आहेत.

Previous Post Next Post