राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
दि बुध्दीष्ट वेल्फेअर सोसायटी दिल्ली यांच्या वतीने दिल्या जाणारा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे घोषणा नुकतीच करण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या मध्ये चिखलदरा तालुक्यातुन आदर्श गाव ग्रामपंचायत गौलखेडा बाजार येथील मा. सरपंच अल्केश महल्ले व वस्तापुर येथिल मा. सरपंच सरस्वती झामरकर यांना भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार यांना घोषित करण्यात आले आहे. तसेच हा पुरस्कार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी तिन वाजता महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे पार पडणार असून गावात अल्केश महल्ले व सरस्वती झामरकर यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच समोरच्या वाटलीच गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.