मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आदीवासी मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्र काटाकुंभ येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवनदान दिले.मेळघाट हा भाग कुपोषण आणि मातामृत्य मुळे नेहमीच चर्चेत असतो.येथील आदीवासी नागरीक शिक्षणापासून थोड्या प्रमाणात वंचित असल्यामुळे यांचा मनात अजूनही जुन्या परंपरा,रूढी,अंधश्रद्धा खोलवर रुजल्या आहेत.मात्र मेलघाटात काही आदिवासी जुन्या रूढी परंपरा,,अंधश्रद्धा यावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.याचाच प्रत्यय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात दिसून आला.प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ अंतर्गत येत असलेले गाव बिबा व माडीझडप येथील राज मानसिंग उईके रा.बिबा वय चार वर्ष व अमित मुन्ना भूसुम वय दिड वर्ष हृदय विकाराने ग्रस्त होते.मुलांचा जन्म झाल्या पासून त्याना हृदय विकाराचा त्रास होता.अशातच आदीवासी कुटूंबाची परिस्थिती हलाखीची होती.हृदय विकाराने मुले ग्रस्त असल्यामुळे दोन्ही कुटूंब टेन्शन मध्ये राहत होते.मुलांचा ऑपरेशन करण्यासाठी आपण लाखाने पैसे कोठून आणू?असे अनेक प्रश्न आदिवासी कुटूंबाचा मनात येत होते.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथील आरोग्य कर्मचारी यांनी या आदिवासी कुटूंबाला योग्य सल्ला दिल्यामुळे दोन्ही मुलांची मोफत हृदय सर्जरी करण्यात आली आहे.दिनांक २०.११.२०२२ रोजी अमरावती येथील नामांकित हॉस्पिटल अच्युत महाराज येथे दोन्ही आदीवासी मुलांची यशस्वीरित्या मोफत सर्जरी करण्यात आली.जुन्या रूढी,परंपरा,अंधश्रद्धा झुगारून या आदिवासी कुटूंबांने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.व मेळघाट सारख्या अतिदुर्गम व डोंगराळ भागात एक छोट्याशा गावात राहून आरोग्य कर्मचाऱ्याचा सल्ल्याने आपल्या पोटाचा गोळ्याला जीवनदान देण्यास यश आले आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सामुदाय अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा परिचारिका, आशा सेविका,अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.
मेळघाटातील हृदय विकाराने ग्रस्त आदीवासी मुलांना मिळाला जीवनदान...प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभची उत्कृष्ट कामगिरी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...