हिवरखेड तेल्हारा मार्ग पूर्णपणे धुळीने भरला असून या मार्गावर खंडेचं खड्डे शिल्लक राहिले तर हा मार्ग दुरुस्त व्हावा याकरिता संबंधित लोकप्रतिनिधीसह या मतदारसंघातील आमदारांना जागरूक नागरिकांनि वेळोवेळी साकळे घातले तर सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार तेल्हारा यांनी रस्ते मंत्री गडकरी यांची भेट सुद्धा घेतली लोकप्रतिनिधीनि फक्त आश्वासने दिली तर सध्या कासव गतीने या रस्त्याचे काहीप्रमाणात काम सुरू झाले ,परंतु रस्त्यावर टँकरद्वारे पाणी टाकत नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळच धूळ दिसून येत आहे। , या रस्त्यावर दिनांक २२ च्या नोव्हेंबरला एकाच दिवशी दुपारी दोन बसेस बंद पडल्या प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागला तर काही ज्या घाई मध्ये असणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा सहारा घ्यावा लागला या रस्ता तात्काळ दुरूस्त न झाल्यास यापुढे आणखी मोठं मोठे अपघात होण्याची शक्यता दिसून येते, हा रस्ता २०२२ संपेपर्यंत निदान दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्ग करीत आहेत,
तेल्हारा हिवरखेड मार्गावर} रस्त्यामुळे एकाचदिवशी दोन बसेस पडल्या बंद,,,रस्त्यावर खड्डे आणि फक्त धूळ,,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड....