हिवरखेड येथे विविध आजारावरील शिबिराचे आयोजन तर सामाजिक कार्य जोपासणाराचें सत्कार ,,


 अर्जुन खिरोडकार/ हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील अली क्लिनिक मध्ये रविवार 27 नोव्हेंबर 2022 रोजी  निशुल्क भव्य मेडिकल कॅम्प तपासणी व उपचार तसेच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर आशिष राजेंद्र जी अस्वार व डॉक्टर गजानन भगत येथील डॉक्टर शत्रुघ्न जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हिवरखेड येथील शराफत अली, मो. शफाकतभाई , अनंत पाटील , गौतम इंगळे, एजाज अली , महेंद्र कराळे , अर्जुन खिरोडकार, अ. रशीद , धीरज बजाज , रितेश टीलावत , राहुल गिऱ्हे , शहजाद खान आदी मान्यवरांचा सत्कार समारंभ सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.निशुल्क तपासणी शिबिरात दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल , अपेन्डिस , थायराइड , डायबिटीक फूट आदी रोगांवर निदान व उपचार हे डॉक्टर आशिष अस्वार , एम. एस. जनरल सर्जरी  हे करणार असून डोळे तपासणी डॉक्टर शत्रुघ्न जाधव हे करणार आहेत तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सय्यद वाजिद अली यांनी केले आहे.

Previous Post Next Post