धारणी येथें राठोड तीर्थ न्यास कार्यक्रम संपन्न...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

धारणी येथील राठोड तेली समाजाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष गोपाल राठोड यांनी स्थानिक बालाजी मंगलम येथें राठोड समाजाचे सामाजिक मेळावा व दिवाळी मिलन चे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये उज्जैन जवळ तयार होतं असलेल्या राठोड तीर्थन्यास बाबत नियोजन या मेळाव्यात करण्यात आले.उज्जैन जवळ 25 एकड भूमीवर राठोड समाज तीर्थन्यास तयार करण्यात येत आहे. राठोड न्यास निर्मान च्या नियोजनाच्या दृष्टिकोनातुन सदर कार्यक्रम करण्यात आले होते. यामध्ये गोपाल चंद्रसेन राठोड कलमखर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या पत्नी सौं.मीनाताई गोपाल राठोड यांनी सदर राठोड तीर्थन्यास साठी 151000 रुपये दानराशी देण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील राठोड तेली समाजाच्या त्या एकमेव महिला आहेत की त्यांनी एवढी मोठी रक्कम न्यास साठी देण्याची घोषणा केली.राठोड न्यास चे कार्य पूर्ण करण्यासाठी 101 फाउंडर सदस्य तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकाणे एक लक्ष रुपये दिले आहे.या कार्यक्रमाला आलेल्या सर्व राठोड समाजाच्या अतिथिंचे शाल श्रीफळ व भगवत गीता देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राठोड समाजाचे अध्यक्ष श्रीराम नारायणसिंह राठोड उज्जैन, महामंत्री दिलीपसिंह राठोड खरगोन, कोषध्यक्ष राजेश सोलंकी सावरोद, प्रवक्ता हरीश राठोड इंदोर,कार्यकारी अध्यक्ष मनोज राठोड इंदोर,उपाध्यक्ष गोपाल राठोड कळमखार, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते सर्वांचे भव्य स्वागत,झाले प्रत्येकानी आपापली मते स्पष्ट केली.

Previous Post Next Post