धारणी तालुक्यातील पुष्कळ खेडेगावात टान्शफारम मुळे विज पुरवठा बद असल्याने येथिल शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्याच प्रमाणे धारणी तालुक्यातील तालुकया पासुन ३२ किमी असलेल्या गाव कुंटगा या गावातील असलेले टान्शफारम पधरा दिवसा पासुन बंद होते तसेच येथिल शेतकऱ्यांची शेती मध्ये असलेले पिक पाणी अभावी सुखत असल्याने येथिल शेतकरी चिंतेत पडले होते. ही माहिती दि. २६/११/२०२२ ला जिल्हा परिषद अमरावती समाज कल्याण मा. सभापती दयाराम काळे यांना मिळताच कुंटगा गावातील शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व लगेच येथिल महावितरणच्या रामटेके साहेब अधिकाऱ्यांशी दुरध्वनी व्दारे संपर्क करुन कुंटगा गावा करीता नवीन टान्शफारम देण्याची मागणी केली होती.हे दयाराम काळे यांची व शेतकऱ्यांची बाजु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवता लगेच कुंटगा गावाला नवीन टाॅन्सफारम दि. २९/११/२०२२ ला बसविण्यात आले असुन शेतकऱ्यांन मध्ये आनंदीचा वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जिल्हा परिषद समाज कल्याण मा. सभापती दयाराम काळे व महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांचे येथिल गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.
RC24News बातमी चा परीणाम दयाराम काळे यांच्या प्रयत्नाने कुंटगा येथे नवीन टाॅन्सफारम बसविले...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...