वनपरिक्षेत्र कार्यालय जारीदा प्रादेशिक येथे संविधान दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून साजरा करण्यात आला.भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले.तेव्हा पासून हा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.राष्ट्रीय संविधान दिवस हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.या प्रसंगी विलास नायकोडे वनरक्षक यांनी उपस्थित वन कर्मचारी यांना संविधान दिवस निमित्ताने मार्गदर्शन करताना सांगितले की,सामाजिक,न्याय,आणि अधिकारीता मंत्रालयाने २६ नोहेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.जेणेकरून नागरिकांना आपल्या अधिकार विषयी माहिती मिळेल.देशातील जनतेला संविधानाची जाणीव व्हावी व देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानिक मूल्याची माहिती व्हावी या साठी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे या दिवशी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकीचे शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाचन केले जाते.आणि भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि महत्व यावर चर्चा केली जाते. या नंतर उपस्थित कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आकाश माहोरे वनरक्षक,सुभाष धुर्वे वनरक्षक,विलास नायकोडे वनरक्षक,विशाल मेहरे वनरक्षक,वैष्णवी धुर्वे डाटा ऑपरेटर, झुलू चिमोटे वनमजूर,हरी मुंडे,व वन कर्मचारी उपस्थित होते.
वनपरिक्षेत्र कार्यालय जारीदा प्रादेशिक येथे संविधान दिवस साजरा...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी