जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मतदारसंघाचे भाग्यविधाते कर्मयोद्धा विदर्भातील भाजपाचा ओबीसी चेहरा म्हणून जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष माजीमंत्री डॉ. संजय कुटे यांची महाराष्ट्रात सर्वदूर ओळख आहे.तसेच ते उपमुख्यमंत्री नामदार देवेद्र फडणविस यांचे निकटवर्तीय व महाराष्ट्राच्या सत्तावर्तुळात हायहोल्टेज आ. म्हणून डॉ.संजय कुटे ओळखले जातात. आता भाजपाने आ. डॉ. संजय कुटे याची भाजपाचा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश प्रभारी म्हणून विशेष नियुक्ती केली आहे.महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार ३० नोव्हेंबरला एका पत्राद्वारे ही निवड केली आहे. जळगाव जामोद मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी करीत आमदार डॉ.संजय कुटे यांचे अभिनंदन केले आहे. गतवेळेस मंत्री मंडळात आमदार डॉ. संजय कुटे यांनी ओबीसी मंत्रालयाचा कॅबीनेट मंत्री म्हणून कार्यभार सांभळला होता. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्त्याने ते सक्रीय भूमिका निभावतात आहेत. गेल्या ४ टर्मपासून पक्षाच्या पातळीवर ते ते उत्कृष्ठ कामगिरी पातळीवर आहेत.सारथी अन महाज्योती निर्मितीसाठी त्यांनी न भुतो न भविष्यती कार्य करीत ओबीसी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सामजिक शैक्षणिक प्रगतीसाठी अतुलनीय कार्य केले आहे. डॉ. कुटेच्या निवडीचे पक्षस्तरावर व मतदार संघात स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post Next Post