सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...
शिवसेना नेते श्री.अरविंद सावंत विदर्भ संपर्क प्रमुख,संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड,जिल्हा प्रमुख नितीन बाप्पू देशमुख,जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,माजी आमदार संजय गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुक्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे त्यांना प्रशिक्षण मिळावे याकरीता पोपटखेड रोड स्थित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर क्रीडा संकुल उभारण्यात आले.परंतु सद्यस्थितीत या क्रीडा संकुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्या ठिकाणी खेळाडूंना आवश्यक सोयी सुविधांचा मोठा अभाव दिसून येतो.अकोट तालुक्यात तयार होणारे खेळाडू हे राज्य व देश पातळीवर चमकतात परंतु अकोट मधील क्रीडा संकुलाची झालेली दुर्दशा त्यामुळे खेळाडूंमध्ये सराव व प्रशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे.विशेष म्हणजे याठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी हे पद रिक्त आहे.लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधलेले क्रीडा संकुल आज धूळ खात आहे त्याठिकाणी अपेक्षेनुसार कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.क्रीडा संकुल धावपट्टी वर अनेक होतकरू विद्यार्थी सराव करण्यासाठी येतात परंतु त्या ठिकाणी असलेली धावपट्टी ही कमी पडत आहेत त्यावर दगड पडलेले असल्याचे निर्दशनात आले आहे ज्यामुळे एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत होण्याचे नाकारता येत नाही.पावसाळ्यात या खेळपट्टीवर पाणी साचते अशी बिकट अवस्था या खेळ पट्टीची झालेली आहे.क्रीडा संकुल मध्ये असलेले साहित्य दर्जेदार नाही,शौचालय बंद अवस्थेत दिसते,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच परिसरात पथदिवे कमी आहेत.सदर प्रकारामुळे तालुका व शहरातील अनेक विद्यार्थी सरावापासून आज वंचित राहत आहेत.तरी मा.जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालून अकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अश्या आशयाचे निवेदन आज मा.उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी यांना शिवसेनेतर्फे शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.याप्रसंगी शिवसेना माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे,अंकुश कुलट,विठल रेळे,विलास ठाकरे,संजय गयधर,अशोक भोंडे,बजरंग भगत,अमोल पालेकर,गोपाल चावरे,विजय वितणकर,सागर कराळे,पवन पांडे,शरद वसू,राहुल नारे,प्रशांत भिसे,वैभव अंबुसकर,अक्षय बनसोड,शंभू चव्हाण,प्रशांत,अनिकेत शेंडे,राहुल शिवनकार,अक्षय बुंदेले,शोर्य बोचे,सागर ठाकरे,आनंद रेळे,महेश शेगोकर,योगेश तळोकार,वासुदेव गावंडे,सुनील नावकार,निखिल नीचळ,गौरव वानरे,निखिल नावकर,अंकुश शेंडे,गौरव तायडे आदींची यांची उपस्थिती होती.