थोर समाज सुधारक बहुजनांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडशिंगी येथे सुद्धा संविधान दिन व क्रांतिसूर्य महात्मा फुले याची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गावच्या सरपंच सौ शितल सुनील वानखडे, तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, सौ शुभांगी अविनाश उमरकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोळंके सर, महिला बचत गटाच्या सौ शालिनी वानखडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या...
थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी वडशिंगी येथे साजरी...
जळगाव जा.प्रतिनिधी:-