विना परवाना रॉयल्टी नसताना पूर्णा नदीपात्रातून अवैध्य रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन मोठ्या टिप्परला शेगाव येथील तहसीलदार यांच्या पथकाने पकडले आहे सदर घटना दि. 5 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास कठोरा शिवारात घडली तर पकडलेली वाहनेही शेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले असून रेती माफीया विरुद्ध २ लाख 44 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की भास्तन - कठोरा शिवारामध्ये असलेल्या पूर्णा नदीपात्रातून अवैद्य रित्या वाळू ची वाहतूक बिना परवाना रॉयल्टी नसताना सुद्धा दिवस रात्र खुलेआम होत असल्याची माहिती शेगाव येथील तहसीलदार समाधान सोनवणे यांना मिळताच त्यांनी सापळा रचून दि. 5 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कठोरा शिवारातून अवैद्य रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या 2 टिप्पर ला पकडले आहे. तर पकडलेली वाळूची वाहने ही शेगाव येथील तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले असून त्यांच्या कडून 2 लाख 44 हजार रुपयांचा दंड ठोकवण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. तर वाळू माफिया वर केलेल्या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे एवढं मात्र खरे.
अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या 2 टिप्पर ला पकडले. शेगाव येथील तहसीलदार यांच्या पथकाची कारवाई...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी..
