रामा धांडे यांची ओबीसी बहुजन महासंघच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:- 

रामा गोपाल धांडे यांची ओबीसी बहुजन महासंघ जळगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती हे  ओबीसी बहुजन महासंघचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजकुमार जी घुले यांच्या आदेशानुसार ओबीसी बहुजन महासंघचे राष्ट्रीय सचिव जफर खान अमानुल्लाह खान हस्ते  दिनांक०३/०३/२०२२ रोजी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.  रामा धांडे हे त्यांच्या मागील सामाजिक सेवा करण्याच्या अनुभातून  जळगाव जामोद तालुक्यातील ओबीसी बहुजन नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्ननं  वाचा फोडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व ओबीसी बहुजन महासंघ या संघटन रूपी परिवाराला मजबूत करण्याचा कार्य करणार.असे विश्वास राष्ट्रीय सचिव जफर खान अमानुल्लाह खान यांनी वेक्त केले व ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले,ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन पोद्दार , ओबीसी बहुजन महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. बालाजी सुवर्णकार , ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळे ,राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी बहुजन महिला महासंघ  सौ. श्वेताताई राहागंडाले ,राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी बहुजन महिला महासंघ सौ. दर्शना घुले ,महिला मराठवाडा विभाग प्रमुख ओबीसी बहुजन महासंघ  सौ. स्मिताताई पोतदार , यांनी त्यांच्या निवडणुकीचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या या निवडीबद्दल अल्पसंख्याक नागरिकांमध्ये त्यांची सर्वात अभिनंदन व कौतुक होत आहे.

Previous Post Next Post