हिवरखेड येथे ६ डिसेंबरला ठीक ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले,तर अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला, हिवरखेड बस्थांकावर डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या मोठया प्रतिमेचे पूजन करण्यात आले,तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाना बाबासाहेबाना अभिवादन करता यावे अशी सोय सुद्धा बस्थांकावर भिम सैनिकांनि केली, तसेच आंबेडकर ग्रुपच्या वतीने बस्थांक परिसरात स्वच्छता करण्यात आली, गावातील मिलींद, सिद्धार्थ नगर, चंद्रमनी नगर,इंदिरा नगर, भिम नगर , ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, पत्रकार कार्यालय,शाळा,महाविद्यालय ,अशा विविध ठीक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, तर भिम नगर येथे पहाटे बौद्ध उपासक उपासीका यांच्या वतीने वंदना अर्पण करण्यात आली, तसेच संध्याकाळी सामूहिकरित्या अभिवादन करण्यात आले, लहान चिमुकल्याना सुद्धा बाबासाहेब याच्या जीवनावर विचार व्यक्त करण्याची संधी देण्यात आली, उपस्थित समाजसेवकानीं मनोगत व्यक्त केले, शिका,वाचा,लिहा, बाबासाहेबांच्या विचारावर चला असे व्याख्यानात सांगण्यात आले, ग्रामपंचायत सरपंच सौ वैशाली वानखडे, नंदाताई मानकर, रवी घुंगड, रवी मानकर, गणेश वानखडे, सुमित ढबाले ,यांनी या स्थळी भेट दिली तर यावेळी उपस्थित उत्तमराव इंगळे, दीपक इंगळे, सुरेश इंगळे, प्रकाश खोब्रागडे, बाळासाहेब भोपळे, सुनील इंगळे, प्रशांत इंगळे, संतोष शर्मा, प्रदीप पाटील, अब्दुल आदिल, तायडे सर,उमेश इंगळे,दिनेश इंगळे, मिलिंद इंगळे, शिधुधन इंगळे, दिलीप घनबहाद्दूर, अरुण इंगळे, महेंद्र वाकोडे, लखन इंगळे, रवी दारोकार, गोपाल इंगळे, अर्जुन खिरोडकार, किशोर वासेकर, पवन गवई, आधी भिम सैनिक उपस्थित होते,
महापरिनिर्वाण दिनानिमित्त हिवरखेड मध्ये ठीक ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड.
