बी एस पटेल महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन...


जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील स्थानिक बापुमीया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक 20 डिसेंबर 2022 रोज मंगळवार  ला संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. सलिमजी पटेल साहेब , सहसचिव रब्बानी देशमुख सर ,संचालक प्रा. कय्युम पटेल ,  सिराजोद्दीन  पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांच्या पुणयतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद इंगळे हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.कय्युम पटेल यांचीही उपस्थिती होती. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला दीपप्रज्लन करून पुष्पहार अर्पण  करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा.किशोर गवई यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच प्रा. प्रदीप गायकवाड यांनी सुद्धा संत गाडगेबाबांच्या समाजसेवेच्या व जीवनकार्याची माहिती दिली.त्याच बरोबर ईश्वर जाधव, पवन उगले या विद्यार्थ्यांनी सुद्धा संत गाडगेबाबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर श्रद्धा घटे या विद्यार्थिनीने गाडगेबाबा यांच्या जीवनावर कविता सादर केली.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी संत गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्च केले.तसेच त्यांच्या विचारांचा व कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा.कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. किशोर गवई यांच्या मार्गदर्श नात करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.12 वी. च्या कु.मंगला इंगळे या विद्यार्थिनीने केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन कु. पुनम बोंबटकर हिने मानले कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.शेख वाहिद, उपप्राचार्य प्रा.अतुल उगले, प्रा. जितेंद्र कचवे, प्रा. सागर बांगर , प्रा. परविंदर सिंघ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post