ताणतणाव दूर करण्याच्या सोप्या पद्धतीवर तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष प्रा कय्युम पटेल प्राचार्य डॉ. आय. ए. राजा यांच्या सहकार्याने दिनांक 24/ 11/ 2022  ते 26 /11/ 2022 च्या दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन उप प्राचार्य अतुल उगले यांनी केले व अशा प्रकारच्या कार्यशाळेचा लाभ युवक व युवतींना फार मोठ्या प्रमाणात  होऊ शकतो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये ताण तणाव का निर्माण होतो याची कारणे काय असतात तसेच दुसऱ्या दिवशी ताण तणाव घालवण्यासाठी उपचार पद्धती सांगितल्या त्यामध्ये विविध योगासने प्राणायाम व ध्यान करावे याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या कला कौशल्यावर भर द्यावा व तणावापासून मुक्ती मिळवावी. कुठलाही व्यक्ती जर नैतिक आणि संविधानिक नियमांचे काटेकोर पालन करत असेल तर त्यांना तान तनाव येत नाही, यासारख्या बऱ्याच गोष्टी या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविल्या व तिसऱ्या दिवशी समारोपीय कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले फीडबॅक दिले त्यामध्ये त्यांनी जर अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमित झाल्यात तर विद्यार्थी बऱ्याच ताणतणावापासून मुक्त राहतील आणि चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत. वरील तीन दिवसीय कार्यशाळेला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉ बाबाराव सांगळे यांनी मार्गदर्शन केले..वरील कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी आय क्यू ए सी कोऑर्डिनेटर डॉ ए एस काजी ,डॉ आनंद जाधव, प्रा महेश  नेतनस्कर, उप प्राचार्य डॉ नूर मोहम्मद, व डॉ चेतन पलन डॉ शेख फराह, डॉ निखिल, अग्रवाल ,प्रा मनोहर जांभळे ,प्राध्यापक नितीन असोले, प्रा प्राजक्ता बाठे, प्रा मो. शोयब, गजानन इंगळे, गजानन भोपळे ,मोहम्मद मोसाब, प्रा बनकर,प्रा कचवे, प्रा पांडव, विश्र्वास टाले परेश अवचार ,अक्षय तायडे, यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post