चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथील आरोग्य कर्मचारी यांनी काही दिवसा अगोदर अतिदुर्गम गाव माडीझडप,बिबा व काजलडोह येथील तिन आदीवासी मुलांची हृदय शस्त्रक्रिय मोफत करून आदीवासी मुलांना जीवनदान दिले.अशीच एक आदीवासी माता राखी सुनील भवरे वय २० वर्ष प्रस्तुती करीता प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथे भरती करण्यात आली होती. सदर महिलाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांला तात्काळ अचलपूर येथे भरती करण्यात आले.प्रस्तुती झाल्यानंतर महिला आपल्या बाळासोबत सात दिवस अचलपूर दवाखाना येथे उपचार घेत होते.बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळामध्ये कमजोरी होती. अचलपूर दवाखाना येथे उपचार घेत असताना बाळाचा प्रकृती मध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्यामुळे बाळाला पंजाबराव देशमुख दवाखाना अमरावती येथे भरती करण्यास सांगितले परंतु माता आपल्या बाळाला घेऊन घरी पळून आली.वैद्यकीय अधिकारी डॉ रागेश्री माहुलकर ,आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी महिलेला सांगितले की,तुम्ही बाळाला भरती करा परंतु महिलेने बाळाला भरती करण्यास नकार दिला. काही दिवासानंतर बाळ काहीच हालचाल करत नसल्याची माहिती स्थानिक आरोग्य सेविका यांना मिळाली.बाळाला प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथे उपचार करण्यासाठी आणले.काटकुंभ येथील वैद्यकीय अधिकारी यांनी बाळाची तपासणी केली असता बाळाची प्रकृती चिंताजनक आढळून आली.वैद्यकीय अधिकारी माहुलकर मैडम यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळाला होप हॉस्पिटल अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले. अमरावती येथे उपचार सुरू केल्याने बाळाचा प्रकृती मध्ये सुधार होऊ लागले.काही दिवस बाळ हा व्हेंटिलेटर वर होता या सर्व गोष्टी वर मात करून आदीवासी बाळाचे प्राण वाचले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांनी आणखी एक आदीवासी बाळाला जीवनदान दिले आहे.तब्बल एक महिना सात दिवसनानंतर बाळाला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.या सर्व संघर्षा मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.माहुलकर मैडम यांना डॉ.रनमाले जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.सतीश प्रधान तालुका वैद्यकीय अधिकारी,व होप हॉस्पिटल अमरावती येथील संपूर्ण आरोग्य कर्मचारी,प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची साथ मिळाली. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य कर्मचारी यांनी अजुन एक आदीवासी बाळाला जीवनदान दिले आहे.या कार्यमुळे वैद्यकीय अधिकारी डॉ रागेश्री माहुलकर मैडम यांची सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
योग्य सल्ला दिल्याने आदिवासी मातेचा पोटाच्या गोळ्याला मिळाला जीवनदान...काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ.रागेश्री माहुलकर मैडम यांचा प्रयत्नाला यश..।
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी