आंतरमहाविद्यालयीन आर्चरी स्पर्धेत बी एस पटेल महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी चमकले...


 जळगाव जा.प्रतिनिधी:-

पिंपळगाव काळे येथील बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथील धनुर्विद्येचा खेळाडू प्रथमेश समाधान जवकार याने कंपाउंड प्रकारामध्ये प्रथम स्थान तर प्रणित देशमुख या खेळाडूने तृतीय स्थान पटकावले तसेच शिवा भरत आडवे या खेळाडूने भारतीय धनुर्विद्या प्रकारामध्ये प्रथम स्थान पटकावले. अमरावती विद्यापीठ अंतर्गत, 2 डिसेंबर रोजी नेर परसोपंत यवतमाळ येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन आर्चरी स्पर्धेत मानांकन मिळविलेल्या या खेळाडूंची निवड  विद्यापीठात होणाऱ्या कॅम्पसाठी झाली असून, 24 डिसेंबर,भटिंडा पंजाब येथे होणाऱ्या भारतीय अंतर विद्यापीठ आर्चरी स्पर्धेसाठी झाली आहे.महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष  ॲड सलीम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष प्रा कय्यूम पटेल, सिराजोद्दीन भाई पटेल, प्राचार्य डॉ आय ए राजा, शिवबा आर्चरी अकॅडमीचे कोच चंद्रकांत इलग शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे व महाविद्यालयातील आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ ए एस काजी उपप्राचार्य डॉ नूर मोहम्मद व डॉ चेतन पलन डॉ शेख फराह प्रा महेश  नेतनस्कर डॉ निखिल अग्रवाल डॉ आनंद जाधव प्रा प्राजक्ता बाठे  प्रा मनोहर जांभळे प्रा नितीन आसोले प्रा मोहम्मद शोयब, गजानन इंगळे गजानन भोपळे मोहम्मद मोसाब विशाल दाणे अमोल देवकर परेश अवचार व महाविद्यालयीन सर्व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन  केले.

Previous Post Next Post