क्रीडा युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा क्रीडा संकुल बुलढाणा च्या मैदानावर दिनांक 03/12/2022 रोजी पार पडली या स्पर्धेत जिल्हाभरातुन विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत सातपुडा काॅन्व्हेट जळगाव जामोद चे विद्यार्थी पराग तायडे यांने भालाफेक मध्ये व्दितीय तसेच अनुप भोंडे याने उंची उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.हे खेळाडू विद्यार्थी यशाचे श्रेय सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.कृष्णरावजी इंगळे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.सौ.स्वातीताई संदिप वाकेकर,संस्थेचे सी.ई.ओ.श्री.नितिन सातव सर, सातपुडा काॅन्व्हेंटचे कार्याध्यक्ष मा.डाॅ.संदिप वाकेकर सर, सातपुडा काॅन्व्हेंट जळगाव जामोद चे प्राचार्य संतोष बकाल सर व क्रीडा शिक्षक प्रतिक राउत सर यांना देतात. विद्यार्थ्यांसाठी क्रीडा मैदान व क्रीडेचे साहित्य सातपुडा शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
भालाफेक आणि उंच उडी स्पर्धेत सातपुडा काॅन्व्हेट जळगाव जामोद विभागीय स्तरावर..
जळगाव जा.प्रतिनिधी:-
