मेळघाट सेमाडोह, रिझर्व जंगलात रायपूर मार्गावर मानव रहित जंगलात बिबट्या जातीच्या नर मादी प्राण्याला जीवावर मुकावे लागले होते सोबतच एक मसण्या उद सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेले आहे. त्याला वन्य प्राणी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.ही घटना रायपूर जंगलात घडल्याची माहिती पुढे आली.सविस्तर माहिती अशी की गेल्या चार दिवसा अगोदर बिबट बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता , काही क्षणातच या दोन बीबट जातीच्या प्राण्याचा मृत्यू झाला होता किंवा झोपेत असलेले फॉरेस्ट प्रशासन जागी झाले होते याबद्दलची गोपनीता बदनामी पोटी सावरा सावर विभागा कडून करण्यात आली होती. या बाबतची बनव वृत्त माध्यमांना लागतात फॉरेस्ट विभागाची झोप उडाली असता सहाय्यक वनरक्षक चिखलदरा कमलेश पाटील यांनी सूत्र हातात घेऊन या घटनेची सखोल चौकशी करून सेमाडोह येथील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे राहणारा आरोपी राजेश तायवाडे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती फॉरेस्ट विभागाचे अधिकार्यांजवळ त्यांनी कबुली दिली घटनेचे सत्य बाहेर आले स्वार्थासाठी फॉरेस्ट विभागाचे एका अधिकाऱ्याची खुन्नस काढण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीच्या दोन बकऱ्या झिंक फॉस्फेट फवारणीचे औषध देऊन घरी मारण्यात आल्या व त्या बकऱ्यांचे पार्थिव शरीर मृत अवस्थेत त्यांनी जंगलाकडे फेकून दिले त्या बकऱ्यांचे मास खाल्ल्याने त्या वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला. परंतु फॉरेस्ट विभाग प्रशासनाने ना मुश्किल होईल म्हणून या प्राण्यांचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा अशी शंका पत्रकारांसमोर व्यक्त केली होती. परंतु खरे सत्य लवकरच कर्तव्यदक्ष अधिकारी वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या चौकशी दरम्यान उघडकीस आले. आम्ही वारंवार जंगलाच्या सुरक्षा संदर्भात वेळोवेळी मेळघाटचे वृत्त प्रकाशित करत असतो परंतु जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. सेमाडोह २ क्षेत्र नियत आहे. त्यापैकी सहा ठिकाणी वनरक्षकच नसल्याची दिसून येते काही ठिकाणी कर्मचाऱ्याकडे नियत बाह्य अतिरिक्त कारभार देण्यात आल्याने जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर आहे आचार्य जनक बाब अशी पुढे आली की विशेष व्याघ्र संरक्षक यांच्याकडे सुद्धा नियमबाह्य कारभार अतिरिक्त देण्यात आला असल्याची माहिती पुढे येत आहे मेलघाटच्या सुरक्षित वाग्र प्रकल्प जंगलामध्ये वाघ बिबट व अन्य प्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना कर्मचाऱ्यांच्या अपुरे जागा असल्याने प्राण्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचीही चर्चा केली जात असल्याचे समजते. सेमाडोह वन वर्तुळ म्हणजे शिपना वन्यजीव विभाग या ठिकाणी गेल्या तीन वर्षा पासून आर एफ ओ , श्री संग्राम मेश्राम कार्यरत आहेत यांच्याकडे सपना वन्यजीव विभाग पर्यटन संकुल व एस टी पी एफ कॅम्प भरारी गस्त पथक असे अतिरिक्त चार्ज असल्याने एका माणसावर फारच विभागाने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे कमालीचा ताण येत असल्याची दिसून येते फारच विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी काही आर एफ ओ दर्जाच्या अधिकाऱ्यांना अमरावती मुख्यालयात ठेवले असल्याने या कडे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सेमाडोह येथील पुनर्वसनाचा मुद्दा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सेमाडोह येथून पुनर्वसन करावे अशी वेळोवेळी विनंती फॉरेस्ट विभागा कडे नागरिकांनी केली आहे. परंतु त्यांच्या निवेदनाला व मागणीला फॉरेस्ट विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचेही येथील मूळ रहिवाशांनी सांगितले नागरिकांच्या विषयी चर्चा ऐकायला मिळाल्या जर या गावाचे पुनर्वसन झाल्यास येथील वन्यजीव प्राण्यांना मुक्त श्वास घेता येईल जंगलात कोणतीही अप्रित घटना घडणार नाहीत अशा चर्चा ऐकायला मिळाल्या,आता फॉरेस्ट विभागाचे मुख्य वनसंरक्षक काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे ठरले आहे. बिबट्यांना मारणारा आरोपी वनविभागाच्या कस्टडी त असून पुढील तपास सहाय्यक वनरक्षक, कमलेश पाटील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात चौकशी करीत असल्याचे समजले आहे.
सेमाडोह रिझर्व गाभा क्षेत्रात बिबट्या, नर,मादी ठार करणारा संशयित आरोपी हॉटेल व्यवसायिक राजेश किशोर तायवाडे वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताब्यात* घरातील शेळ्यांना झिंक फॉस्फेट फवारणीचे औषध देऊन जंगलात फेकल्याने , या प्राण्यांचा झाला मृत्यू...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
