पत्रकारावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या - शेगाव पत्रकार संघाची मागणी...


सुरज देशमुख /बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

पुणे येथे टीव्ही चॅनलच्या व्हिडिओ जर्नालिस्ट (पत्रकार) विरोधात दाखल झालेले तक्रार व गुन्हे माघारी घेण्यात यावे अशी मागणी शेगाव पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना 12 डिसेंबर रोजी देण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक झाली. यावेळी या शाई फेकीच छायाचित्रण/ व्हिडीओ चित्रण करणारे व्हिडिओ जर्नालिस्ट यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक सर्व कार्यक्रमांचे वार्तांकन करणे हा मीडियाचा अधिकार आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकार हा जमावाचा भाग नसतो. मात्र तरी देखील आपल्या सरकारकडून या व्हिडिओ जर्नालिस्ट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे लोकशाहीच्या विरोधात असून या घटनेचा निषेध नोंदवून पत्रकारावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी शेगाव पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष अमर बोरसे, ज्येष्ठ सल्लागार संजय सोनोने, नंदकिशोर कुळकर्णी, फहीम देशमुख, अविनाश दळवी, दिनेश महाजन, नानाराव पाटील, प्रकाश उन्हाळे, संजय त्रिवेदी, संतोष पिंगळे, उमेश शिरसाट, सचिन कडूकार (ग्रामीम पत्रकार संघ), ज्ञानेश्वर ताकोते, प्रशांत खत्री, नारायण दाभाडे, राजवर्धन शेगावकर, संजय ठाकूर, श्याम पहूरकर, सुभाष वाकोडे, देवचंद्र समदूर, उमेश राजगुरे, अंबादास इंगळे, अर्जुन कराळे, ललित देवपुजारी यांच्या सह्या आहेत.

Previous Post Next Post