जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान...

जळगाव जामोद प्रतिनिधी:-                        

सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन म्हणून सर्वीकडे अभिवादन सभेने त्यांना अभिवादन करण्यात येत असताना त्याच दिवशी स्थानिक आमदार संजय कुटे यांच्या वडिलांचा स्मृतिदिन निमित्त त्यांच्याच मालकीच्या जीनामध्ये आरोग्य शिबीर घेऊन कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळेस प्रथम दर्शनी श्रीराम कुटे गुरुजी यांच्या फोटो शेजारीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा डाव्या बाजूला लावण्यात आली व दोन्ही प्रतिमा समान ठेवण्यात आल्या होत्या वास्तविक पाहता महापुरुषांची प्रतिमा ही सामान्य व्यक्ती पेक्षा थोडीशी उंचावर ठेवण्यात यायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती डाव्या बाजूला ठेवून व समान ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच केला यासंदर्भात आज दिनांक 8 डिसेंबर रोजी जळगाव जामोद येथे सर्वपक्षीय वंचित बहुजन आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पार्टी किसान सभा एम आय एम इत्यादी पक्षांनी मिळून स्थानिक आमदाराचा जाहीर निषेध करून तहसीलदारांना निवेदन सादर केले यावेळेस वंचित चे तालुकाध्यक्ष संतोष गवई राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष अर्जुन घोलप शिवसेनेचे शहराध्यक्ष रमेश ताडे, अजहर देशमुख,सुनिल बोदडे, मंगेश कतोरे राजरत्न वाकोडे व बहुसंख्य  महाविकास आघाडीचे व  वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.. आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला...।

Previous Post Next Post