सेमाडोह वन वर्तुळात रिझर्व गाभा क्षेत्रा मध्ये एका "बिबट्या वाघाचा मृत्यू...लागोपाठ प्राण्यांच्या मृत्यू मध्ये होत आहे वाढ, टायगर विभाग कर्मचारी झोपेतच...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट सेमाडोह रिझर्व जंगलात रायपूर मार्गावर मानव रहित जंगलात पुन्हा एका नि, अपराध. बिबट्या जातीच्या प्राण्याला जीवावर मुकावे लागले,ही घटना रायपूर जंगलात घडल्याची माहिती पुढे आली.आज सकाळी काही पर्यटक जंगलाकडे गेले असता त्यांना मूर्त अवस्तेत ,हा बिबट आढळून आला, काही नागरिकांनी ही माहिती वन विभागाला दिली. कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच संबंधित बीट चे आर एफ ओ खळबळून "सकाळी' जागी झाले.मेलघाट मध्ये अती सुरक्षित जंगलामध्ये या अगोदर अनेक प्राणी मृत्युमुखी पडले असून काही दिवसा अगोदर एका अस्वल चा मृत्यू झालेला होता,त्याच पाठोपाठ आज हा बिबट मृत अवस्थेत आढळून आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.जंगलाच्या सुरक्षेसाठी महिन्याला करोडो रुपये सेंट्रल  गव्हर्मेंट चे खर्च होत आहेत, हजारो कर्मचारी मेलघाटच्या जंगलाचे सुरक्षित असताना प्राण्यांचा मृत्यू  होतो कसा? असा प्रश्न वन्यप्रेमी नागरिकांमधून बोलल्या जात आहे. काही नागरिकांनी असे म्हटले आहे की जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर असून, कर्मचारी घरी बसून पगार उघडत असल्याचेही चर्चा आहेत .जंगलांमध्ये परमनंट असलेले कर्मचारी, वन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जंगल सोडून घरी बसून पगार घेत असल्याच्या  नागरिकांच्या चर्चा सेमाडोह च्या बस स्टॅंडवर ऐकायला मिळाल्या .वरिष्ठ अधिकारी ऑफिसच्या ऐसी मध्ये बसून जंगलाची सुरक्षा तर करत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत झालेल्या प्राण्यांच्या मृत्यूबद्दल एकही अहवाल मीडिया   समोर, प्रसिद्ध न झाल्याने नेमके या प्राण्याचा मृत्यू का झाला असे अद्यापही स्पस्ट होऊ शकले नाही .आता तरी फॉरेस्ट विभागाच्या  अधिकारी कर्मचाऱ्यांनी झोपेतून उठून जंगलाची सुरक्षा करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.नाहीतर उगीचच, वाहनांमध्ये डीजल, पेट्रोल, जळून, ड्रायव्हर कर्मचाऱ्यांना, करोड रुपयाचा पगार ,पोटी, शासनाला चुना लावणे बंद करावे अशा देखील चर्चा नागरिकांकडून ऐकायला येत आहे.

Previous Post Next Post