सिंचनातून_शाश्वत_विकास..मतदारसंघात पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शेतीसाठी सुद्धा पिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारे जलयोद्धा डॉ.संजय कुटे..

जळगाव जा.प्रतिनिधी:-

शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडावयाची असेल तर त्याच्या शेतीला बारमाही पाणी हवे.मग त्याला कोण्या सावकार समोर हात पसरावे लागत नाही. आणि आत्महत्येचा तर प्रश्नच उरत नाही. हे सर्व राजकीय नेत्यांना समजते..परंतु त्यादृष्टीने प्रयत्न फार कमी राजकीय नेत्यांनी केले.माननीय शरदजी  पवार यांनी बारामती मध्ये ते करून दाखविले.जळगाव जामोद मतदारसंघामध्ये हे स्वप्न म्हणजे दिवस्वप्न च ठरले असते.जळगाव जामोद सारख्या आदिवासी ,दुर्गम भागात,विकासापासून कोसो दूर असलेल्या मतदारसंघात हे तर अशक्यच होते.परंतु या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संजय कुटे यांचे दुरदृष्टी मुळे.व सातत्याने केलेल्या प्रयत्ना मुळे,नियोजन बद्ध केलेल्या कृतीमुळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी दरबारी आणि मंत्रालयातअसलेल्या विशेष वजनामुळे हे शक्य होत आहे.शेतकऱ्यांनी पाहिलेले हरित क्रांतीच्या स्वप्न पूर्ण होत आहे.आज मतदारसंघात जिगाव धरण प्रकल्प, चोंडी प्रकल्प, अर कचेरी आलेवाडी प्रकल्प,व आता मंजूर झालेला कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा जलसिंचन प्रकल्प या प्रकल्पामुळे सर्व मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल.आणि खऱ्या अर्थाने सिंचनातून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास होईल. कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा जलसिंचन योजनेमुळे तर या भागाला जो खारपाणपट्ट्याचा अभिशाप लागलेला आहे त्यामुळे जमिनीची प्रत खराब होते.जमीन क्षारयुक्त होते, जमीन काही दिवसांनी नापीक होऊ लागते त्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे कारण या प्रकल्पामुळे जमिनीच्या आतील पाणी जमिनीच्या भूगर्भातील जे क्षारयुक्त पाणी आहे ते शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प आहे. आमदार संजय भाऊ कुटे यांनी या मतदारसंघाला 140गाव पाणी पुरवठा योजनेमुळे सर्व मतदारसंघाला शुद्ध पाणी तर दिलेच आहे.परंतु शेती साठी लागणारे पाणी सुद्धा शुद्ध करण्यासाठी हा प्रकल्प आहे.आणि घरात सुद्धा पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शेतात सुद्धा पिकांना शुद्ध पाण्याची सोय करणारे आमदार संजय भाऊ मात्र एकमेव महाराष्ट्रातील आमदार ठरतात...

Previous Post Next Post