सुटाळा बुद्रुक येथील हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा...


 सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

विठ्ठल बहुद्देशीय सेवाभावि संस्था द्वारा संचालित हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुटाळा (बु) खामगांव येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी संस्थेचे अध्यक्ष जनार्दंजी हेंड पाटिल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर त्यांनी बाबासाहेब याच्या बद्दल प्रशिक्षनार्थ्याना माहिती देवून त्यांनी भारताला दिलेल्या संविधानाबाद्दल माहिती दिली. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य अंकित जयस्वाल यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल प्रशिक्षनार्थ्याना माहिती दिली.तसेच प्रशिक्षनार्थ्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बद्दल भाषणे दिली व सुंदर अश्या कविता सुद्धा गायन केल्या.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जनार्दंजी हेंड पाटिल साहेब, संस्थेचे सचिव हर्षदजी हेंड पाटिल, हर्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अंकित जयस्वाल सर, निदेशक गौरव फुंडकर सर, निदेशक अनिल तेलगोटे सर, निदेशक आकाश मरापे सर, निदेशक सुधाकर निबाळकर सर, व लिपिक शुभम चंभाटे उपस्थित होते.

Previous Post Next Post