हिवरखेड येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी....


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.आदर्श पत्रकार संघाचे पदाधिकारी राजेश पांडव यांच्या निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या इंद्रायणी नदीत बुडविलेल्या गाथा पुन्हा लिहून समाजाला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दरवर्षी हिवरखेड येथे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येत असते त्या अनुषंगाने याही वर्षी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे या जयंती कार्यक्रमाला गावाच्या सरपंच वैशाली इंगळे, मंगला पांडव, निर्मला बेलूरकार, नयना नाचणे,उपसरपंच रमेश दुतोंडे, माजी सरपंच संदिप इंगळे ग्रामपंचायत सदस्य मंगेश ताडे, रवी मानकर, गणेश वानखडे पत्रकार राजेश पांडव, सुरज चौबे,मनीष भुडके,मनोज भगत, साहेबराव बेलूरकार, गजानन गावत्रे, गजानन बेलूरकार, पंजाबराव ईचे, राजू बेलूरकार, दिलीप नाचणे, रामभाऊ नाचणे, प्रमोद निळे, पवन गावत्रे, अंकुश निळे, आदित्य पांडव आदी गावकरी उपस्तीती होते.

Previous Post Next Post