हिवरखेड येथे दिनांक २० डिसेंबरला गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून गावात ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, आकोट हिवरखेड मार्गावरील गाडगेबाबा स्मशान भूमी मध्ये गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन करून गावातील विजय नगर मधील नागदेवता महिला मंडळाच्या महिलांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियान करून खरी पुण्यतिथी साजरी केली, गाडगेबाबानि त्यांच्या आयुष्यात गाव,परिसर स्वच्छ ठेवून मानवतेचा संदेश दिला, गाडगेबाबांचं विचार अंगी ठेवून सर्वांनी समाज सेवा करा असे विचार व्यक्त करण्यात आले, नागदेवता मंडळाच्या अध्यक्षा सुनंदाबाई शेंडे, वनिताबाई दुधे, कुसुमबाई टिपरकार,वनमालाबाई सिरसाट,विमलबाई रेखाते,मगलाबाई कोंबडकार, नर्मदाबाई ढगे,लक्ष्मीबाई मोहतुरे,सुमनबाई ताळे,देवकाबाई ताळे,कमलाबाई गिरहे,ज्योतिबाई गिऱ्हे,सुनीताबाई हागे, समाज सेवक वासुदेव वाघ, अर्जुन खिरोडकार,गणेश महाराज, प्रकाश सिरसाट, बल्लू बलराम, गणेश पानझाडे, हागे आधी उपस्थित होते , तर छायाताई कौसकार नंदकिशोर कौसकार याच्या निवासस्थानी समस्त परीट समाज बांधवांच्या उपस्थितीत महाप्रसाद वितरित करण्यात आला, तसेच गावातील इंदिरा नगर,गिर्हे नगर मधील गाडगेबाबा ,तूकडोजि महाराज यांच्या ग्रामगीता प्रवचनाची सांगता राष्टीय कीर्तनकार गाळेकर महाराज यांच्या हस्ते सपन्न झाली यामध्ये हजारो भाविकांनि महाप्रसादाचा लाभ घेतला, गुरुदेव सेवा मंडळांनी परिश्रम घेतले, तर गाडगे नगरातील गाडगेबाबा संस्थांनवर संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने गर्जुना नवीन वस्त्र वितरित करण्यात आले, गावातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनि स्वच्छता अभियान राबविले,
गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने हिवरखेड मध्ये ठीक ठिकाणी सामाजिक उपक्रम,, गाडगेबाबा स्मशानभूमीत महिला मंडळांनी राबविले स्वच्छता अभियान,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड
