जळगाव जामोद तालुक्यात १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून त्यापैकी निंभोरा बुद्रुक आणि मडाखेड बुद्रुक दोन ग्रामपंचायतीचे सरपंच पदे ही यापूर्वीच अविरोध झाली आहेत. उर्वरित 17 ग्रामपंचायतीसाठी दिनांक 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले आहेत.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने सर्वाधिक तर त्या खालोखाल भाजपाने जागा जिंकले असून शिवसेनेच्या ठाकरे गटाने एकमेव जागा जिंकली आहे.वंचित बहुजन आघाडी ने एका ठिकाणी विजय मिळवला आहे.तर निवडणुकीत माहुली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी गजानन रोठे (180)मतांनी निवडून आले असून त्यांचे प्रतिस्पर्धी विजय रोठे(150)मतांनी पराभूत झाले. गाडेगाव बुद्रुक सरपंच पदी नामदेव खरकंजे 481 मते घेऊन विजयी झाले तर प्रतिस्पर्धी तुकाराम खरकंजे 345 मत ,टाकळी (पारस्कर) सरपंच पदासाठी जयश्री पारस्कर यांना 318 मत तर प्रतिस्पर्धी मंदाबाई पोटे यांना 187 मत ,सातळी सरपंच पदासाठी अनिल भीवटे 422 मत तर पराभूत महादेव भालतडक 385 मत, भेंडवळ खुर्द सरपंच पदासाठी अनिल सोळंके 416 मत तर पराभूत अनमोल सोळंके यांना 185 मत. मडाखेड खुर्द सरपंच पदासाठी नूतन जवंजाळ 287 मत तर प्रतिस्पर्धी कलावती गव्हाळे 178 मत.पळशी (वैद्य)सरपंच पदासाठी पूनम जाधव 409 मत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी रेखा बारगजे 243 मत. पळसखेड सरपंच पदासाठी मंगला सोळंके 187 मत तर पराभूत संगीता सोळंके 168 मत, झाडेगाव सरपंच पदासाठी रामरतन चोपडे 446 मत तर प्रतिस्पर्धी मंगेश बाठे 380 मत. गोळेगाव खुर्द सरपंच पदासाठी सुनील गव्हाळे 242 मत तर पराभूत रतन नाईक 173 मत. गोळेगाव बुद्रुक सरपंच पदासाठी सुनीता हुरसाळ 194 मत तर पराभूत अर्चना हुरसाळ 150मत, हिंगणा (बाळापुर)सरपंच पदासाठी विजय काळदाते 269 मत तर पराभूत सुभाष मानकर 187 मत.मांडवा सरपंच पदासाठी राजकन्या उगले 306 मत तर पराभूत प्रियांका महाले 213 मत .बोराळा खुर्द सरपंच पदासाठी पवनकुमार वाघ 329 मत तर पराभूत मयूर गायकी 305मत,बोराळा बुद्रुक सरपंच पदासाठी नंदकिशोर वाघ 356 मत तर पराभूत अतुल वाघ 342 मत,वडगाव (पाटण)सरपंच पदासाठी रश्मी घुले 545 मत तर रत्नप्रभा राऊत यांना 448 मत.खेर्डा खुर्द सरपंच पदासाठी फुलवंती चव्हाण 633 मत तर पराभूत अर्चना चव्हाण 339 मते प्राप्त झाली आहेत सर्वाधिक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला दावा केला असून त्या खालोखाल भाजपने देखील दावा केला आहे.सध्या दावे प्रति दावे सुरू असून कोण्या पक्षाचे किती सरपंच झाले याचा अंदाज बांधणे संध्या अवघड आहे उपसरपंच निवडी झाल्यानंतरच कोण्या पक्षाचे किती सरपंच व किती उपसरपंच निवडणून आले ते कळेल...
जळगाव (जामोद) तालुक्यातील १९ ग्रामपंचायतचे निकाल जाहीर...
जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-
