जळगाव (जामोद) तालुक्यातील १८ ग्रामपंचायत साठी दिनांक १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी ही बोराला बुद्रुक येथे तर सर्वात कमी टक्केवारी ही भेंडवळ खुर्द येथे निदर्शनास आली.तालुक्याची सरासरी ही ७९.९४% आहे. आज दिनांक २० डिसेंबर रोजी स्थानिक तहसील कार्यालय परिसरात सहा टेबलवर संपूर्ण मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक मतमोजणीसाठी तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मतमोजणी टेबल लावण्यात आले असून टेबल क्रमांक १ वर एस.यु. मोरे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून येथे माहूली,गाडेगाव बुद्रुक ,टाकळी पारसकर आणि सातळी ह्या चार गावांची मोजणी होणार आहे .तर टेबल क्रमांक २ वर एम एस देहनकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असून येथे भेंडवळ खुर्द ,पळसखेड,मडाखेड खुर्द या गावची मतमोजणी आहे. तर टेबल क्रमांक ३ वर आर एस नावकार हे निवडणूक निर्णय अधिकारी असून ह्या टेबलवर झाडेगाव, गोळेगाव खुर्द, गोरेगाव बुद्रुक ह्या तीन गावची मतमोजणी होणार आहे. तर टेबल क्रमांक ४ वर पी एस राजपूत हे निवडणूक निर्णय अधिकारी असून येथे हिंगणा (बाळापुर), पळशी वैद्य आणि मांडवा या तीन गावची मतमोजणी होणार आहे. टेबल क्रमांक ५ वर व्ही एल जुमडे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून येथे निंभोरा बुद्रुक, बोराळा खुर्द ,बोराळा बुद्रुक या तीन गावची मतमोजणी होणार असून टेबल क्रमांक ६ वर एस.डी. अवजाडे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून येथे वडगाव (पाटण) आणि खेरडा खुर्द ह्या दोन गावची मतमोजणी होणार आहे.
उमेदवारांची निकालाची उत्कंठा सिंगेला... सहा टेबल द्वारे आज होणार मतमोजणी...
जळगाव जा.प्रतिनिधी:-
