सुनगाव येथील अवैधदारू अड्डे बंद करा... दारूबंदीसाठी महिला मोर्चा पोलीस स्टेशनवर...


 जळगाव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव हे जवळपास 11 ते 12 हजार लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून, या ठिकाणी अवैधरीत्या सर्वच कंपनीची दारू सहज मिळते तसेच काही अवैध दारूची दुकाने शाळेच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे, शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही असंतोषी दारुडे नाहक त्रास देताना दिसतात, तसेच काही शाळेचे विद्यार्थीही दारू पितानाचे बोलल्या जात आहे. त्यातच सुनगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळही अवैध देशी दारू गावरान दारू विक्रीचा धंदा सुरू असून मद्यधुंद लोक दारू पिऊ त्या ठिकाणी शिवीगाळ करतात याबद्दल अनेक वेळा नागरिकांनी तेथील दारू विक्रेत्याला सांगितले परंतु त्याने अरे रावी ची भाषा वापरून खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या नागरिकांना दिल्या. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून दारूच्या नशेत कोणतीही विपरीत घटना घडू शकते तसेच काही व्यक्ती दारू पिऊन अक्षरशा त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले असतात. व काही अनुचित प्रकार घडल्या जबाबदार कोण राहील म्हणून येथील महिला व पुरुषांनी दिनांक 3 डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठले,वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीताताई हेलोडे यांच्या नेतृत्वात सुनगाव येथील महिला व पुरुषांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला येऊन दारूबंदीकरिता निवेदन दिले आहे. सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनीताताई हेलोडे, सोनमताई वानखडे, ताईबाई हिवराळे, रमाबाई इंगळे, यमुनाबाई जाधव, नंदा तायडे, विजयमाला वानखडे, उज्वला हिवराळे, अर्चना तायडे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवई, उपाध्यक्ष सुनील बोदडे, ज्ञानेश्वर तायडे, तुकाराम जाधव, बळीराम जाधव, सिद्धार्थ वानखडे, अनिल सावळे, सुनील जाधव, सुनील हिवराळे, यांच्यासह शेकडो महिला व पुरुष यावेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते.

Previous Post Next Post