अग्निवीर इंडियन आर्मी मध्ये आकोट तालुक्यातील दोन युवकांची निवड..।अकोट चे ग्रामीण पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न....


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

आकोट तालुक्यातील  रुईखेड या  गावातील विशाल सुनिल इंगळे व सुदर्शन सहादेवराव डाबेराव या दोन व्यक्तींची अग्निवीर इंडियन आर्मी येथे निवड झाली असून या अनुषंगाने शनिवार दिनांक  3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता समर्थ मंगल कार्यालयात अग्नी वीर इंडियन आर्मी जवानांचा भव्य सत्कार सोहळा अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री नितीन देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन   करण्यात आला आहे. व तसेच गावातील देश सेवेत कार्यरत असलेले  राजेश वरठी अजय मालवे संदीप वाकोडे या जवानांचा पण सत्कार करण्यात आला आहे.  तसेच अकोट ग्रामीण  पोलीस स्टेशनला कार्य मूल्यांकनामध्ये जिल्ह्यातून सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल ठाणेदार नितीन देशमुख यांचा पण सुद्धा  रुईखेड येथिल गावकऱ्यांन कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे. तसेच आऊट पोस्ट पोलीस चौकी रुईखेड चे बीट जमादार गजानन भगत यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.   या कार्यक्रमाला  उपस्थित म्हणून आकोट पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितिन देशमुख यांनी रुईखेड येथिल नवयुवक जवानांना मोलाचे मार्गदर्शन केले.  बोलल्या जात आहे कि विशाल सुनील इंगळे व सुदर्शन शहादेवराव डाबेराव दोन्ही युवकांनी कुठली सुविधा नसतांनी सुविधांचा अभाव असतानाही स्वतःच्या बळावर हे अग्निवीर इंडियन आर्मी मध्ये यांची निवड झाली असुन निवडीबद्दल परिसरातील नागरिकांन कडून दोघांचे कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक नितिन देशमुख, अध्यक्ष  अकोट तालुका काँग्रेस कमिटी चे अनोक राहणे, सुधीर मेतकर,  विलास महाराज झापे, श्री गोपाल ठोसर, निलेश कोकाटे, आशिष झापे, पत्रकार मंगेश निंबोळकार व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 

----------------------------------------

 आताच्या पिढीचे युवकांनी आपल्या जिवनावर लक्ष देणे गरजेचे आहे जने करून आपण शुरविर अर्जुन यांच्या प्रमाणे आपलं  लक्ष हे ध्येयाकडे मोडल्या गेले पाहिजे तसेच जिवनात ठामपणे असणे हे पण महत्वाचे असणे गरजेचे आहे

ठाणेदार नितीन देशमुख..

Previous Post Next Post