गेल्या अनेक वर्षांपासून ''करणवाडी' येथील विद्यार्थी 'पिंपळगाव काळे व जळगाव जामोद' या गावी बस ने शिक्षण घेण्यासाठी प्रवास करत होते. परंतु काही दिवसांपासून विद्यार्थी बस सेवेपासून वंचित राहत आहेत व त्यांना शिक्षण घेताना प्रवासासाठी बस नसल्याने उपेक्षित राहावे लागत आहे.परिणामी काही विद्यार्थ्यांना सायकलने ऑटो ने शाळेत जावे लागत आहे जे की जिवघेणे आहे.तरीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता त् जळगाव (जा) बस डेपो अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात यावी या साठी आज 'करणवाडी' गावातील विद्यार्थ्यांचे पालक,गावकरी तसेच आम्ही सोबत मिळून बस स्थानक प्रमुखांशी, बस फेरी संदर्भात सविस्तर चर्चा करून रीतसर निवेदन देण्यात आले.त्या वेळी एकनाथ बोपले, गौतम आठवले, महेंद्र इंगळे, संदीप बारगजे, भगवान भोंगरे, राहुल पातोडे, विजय इंगळे, शांताराम भोपळे, ज्ञानदेव भोपळे, महादेव आठवले, सुभाष शेगोकार, प्रशांत भोजने, दीपक जाधव, रेखा बारगजे अशोक टाकळकार ,विजय सातव इ. उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी करणावडी ते जळगांव (जा) बस सुरू करा.!
जळगांव जा.प्रतिनिधी:-अशोक टाकळकर...