धुळघाट रेल्वे वन शिवार पळशकुंडी जंगलात कर्तव्यावर असलेल्या रुमालसिंग नामक वनमजुरांवर अस्वलीचा हल्ला..अस्वलीचा हल्ल्यात रुमालसिंग गंभीर जखमी...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी तालुक्यातील शिवाझीरी येथील रहिवासी  रुमालसिंग तेहरसिंग राठोड  वय५४ वर्ष धुळघाट रेल्वे वन परीक्षेत्रात सेवाकर्तव्य करत असतांना जंगलात गस्त दरम्यान रुमालसिंग राठोड नामक वन मजुरांवर अस्वलीने जीवघेणा हल्ला चढविला या हल्ल्यामध्ये रुमालसिंग गंबीररित्या जखमी झाला आहे.धुळघाट रेल्वे वन परी क्षेत्रातील पळसकुंडी भागातील हि घटना आहे.सदर घटना शनिवारी (१०डिसेंबर) सकाळी अंदाजे ११:०० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मेळघाट वनविभागा अंतर्गत येणाऱ्या धुळघाट रेल्वे वन परीक्षेत्रातील वनखंड क्रमांक १२२५ नियतक्षेत्र पूर्वबिरोटी वर्तुळ बिरोटी जंगल गस्त दरम्यान घडली.निलेश साबळे वनरक्षक,तानाजी धुळे वन मजूर,रुमालसिंग राठोड वनमजूर असे तिघे जण १० डिसेंबर रोजी सकाळचा दरम्यान पळसकुंडीच्या घनदाट जंगलात सेवाकर्तव्य म्हूणन जंगलगस्त करीत होते.या दरम्यान एका मादी अस्वलीकडून रुमालसिंग राठोड वन मजूर यावर अचानक पणे मागून प्राणघातक हल्ला करून जखमी केले.घाबरलेल्या सहकारी कर्मचारी कडून आरडाओरडा चालू झाल्याने अस्वलीने तेथुन पळ काढला परंतु तोपर्यंत चवताळलेल्या  अस्वल कडून रुमालसिंग राठोड याचा छातीवर बसून डोक्यावर,पायाचा पोटरीवर,मांडीवर आणि छातीचा भाग हाताचा तिक्ष्ण नखांनी तसेच धारधार दातांनी मांसाचे लचके तोडून त्यास गंबीर जखमी केले.पण सहकारी कर्मचाऱ्यांकडून धाडशी समयसूचकता रुमालसिंगची  प्राणज्योत वाचाविण्यात यशस्वी ठरली.वनरक्षक निलेश साबळे यांनी घटनेची संपूर्ण माहिती लगेच वन परी क्षेत्र अधिकारी पंकज अळसपुरे यांचा वाकी टाकी तथा वायरलेस पर्यंत पुरवून प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे येथून घटनास्थळी रुग्णावाहिक बोलावून घेतली.तातडीने उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे प्राथमिक उपचार आटपून लगेच उपजिल्हा रुग्णालय धारणी येथून  जिल्हा साम्यान रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले आहेत.

Previous Post Next Post