6 डिसेंबर रोजी कुटे गुरूजी यांची द्वितीय पुण्यतिथि निमित्त विविध सेवा कार्य व सेवानिवृत्त शिक्षक आणि पत्रकार बांधव यांचा सत्कार कुटे गुरूजी फाउंडेशन च्या वतीने आ डॉ संजय कुटे व सौ अपर्णा संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आयोजित आरोग्य शिबिर मधे 65 मोतीबिंदु असलेल्या रुग्नाची शस्त्रक्रिया करण्यात आली, 40000 पेक्षा जास्त शासकीय शाळेतील मुलांची नेत्र तपासनी केल्या नंतर नेत्र दोष आढ़ळलेल्या 1100 विद्यार्थिना मोफत चश्मे वाटप करण्यात आले, क्षयरोग ग्रस्त 32 रूगणाची तपासनी करुण त्यांचे पुढील उपचारासाठी नोंद करण्यात आली त्या सोबतच नोंदनी झालेल्या 300 पेक्षा जास्त कुपोषित बालक व त्यांच्या माताँची आरोग्य तपासनी करुण त्यांच्या पुढील उपचारासाठी नोंद करण्यात आली. या शिबिरा ला जळगाव जामोद मतदारसंघातील रुग्णनी मोठ्या प्रमाणात उपस्थिति लावली होती. सदर कार्यक्रमा चे संचालन प्रा नानासाहेब कांडलकर यांनी केले तर प्रस्ताविक आमदार डॉ संजय कुटे यांनी केले व कार्यक्रमचे महत्व त्यांनी यावेळी विषद केले.कुटे गुरूजी हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होते सोबतच त्यांनी पत्रकारिता केली होती त्या अनुशंगाने 75 वर्ष वयावरील जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक आणि 75 वर्षा वरील पत्रकार बांधव यांचा सन्मान पूर्वक सत्कार आ डॉ संजय कुटे व सौ अपर्णा संजय कुटे यांच्या हस्ते शाल, स्मृति चिन्ह व भगवत गीता देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांच्या धर्म पत्नीला साड़ी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी डॉ संजय कुटे म्हणाले की आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा होय कारण आई वडिलांमुळे आपणास हे जग पहवयास मिळाले व त्यांच्या मुळेच आपण सन्मानपूर्वक जीवनाची वाटचाल करु शकलो त्यामुळे तरुणानी आपल्या आई वडिलांच्या सेवे मधे समर्पित व्हावे असे भावपूर्ण मानोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी जळगाव जामोद, संग्रामपुर व शेगांव तालुक्यातील 125 पेक्षा जास्त शिक्षक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा नानासाहेब कांडलकर यांनी केले, संचालन वामन फंड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ किशोर केला यांनी केले. तसेच या प्रसंगी 75 वर्षा वरील पत्रकार बांधव सुद्धा यावेळी उपस्थित होते त्यांचा सुद्धा सत्कार याप्रसंगी शाल, स्मृति चिन्ह व भगवत गीता देऊन करण्यात आला. या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी श्रीमती उर्मिला श्रीरामजी कुटे ह्या होत्या तर शांता बाई कुटे, फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ काळपांडे, विश्वास्त डॉ किशोर केला, दी रा भालतडक, शिवा भाऊ तायडे यांची प्रमुख उपस्थिति होती.त्यांच्या या पुण्यतिथि कार्यक्रमास जळगाव जामोद मतदार संघातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, शिक्षक, डॉक्टर्स, पालक, विद्यार्थी, रुग्ण व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते
श्रीराम कुटे गुरूजी यांचे पुण्यतिथि निमित्त विविध सेवा कार्यक्रम व सत्कार सोहळा संपन्न...कुटे गुरूजी फाउंडेशनचा अभिनव उपक्रम...
जळगाव जा.प्रतिनिधी...
