किरण सेदानी यांना राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर...ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कल कडून घोषणा..२७ डिसेंबरला कोल्हापुरात वितरण...


प्रशांत भोपळे /हिवरखेड प्रतिनिधी....

हिवरखेड येथील ज्येष्ठ पत्रकार किरण सेदानी  यांना नुकताच पत्रकार प्रेरणा  पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे . या पुरस्काराचे वितरण २७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थित केले जाणार आहे.भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना म्हणून ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कल गेले अनेक वर्षे काम करीत असून पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत ते आवाज उठवत असतात. महाराष्ट्रातील अनेक पत्रकाराच्या समस्या मंत्रालयीन पातळीवर सोडवल्या असून या संघटनेचे दरवर्षी अधिवेशन होते. त्यात पत्रकार आपल्या समस्या मांडत असतात. यावर्षीचे अधिवेशन २७ डिसेंबरला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त पत्रकारा बरोबर राज्यातील दोन सामाजिक संस्थाना गौरविण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा समावेश आहे. तसेच पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त पत्रकार  बाळासाहेब गणोरकर व किरण सेदानी यांना गौरविण्यात येणार आहे..किरण सेदानी हे गेली 10 वर्षे विविध दैनिकातून आपली पत्रकारिता करीत असून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले असून त्याचा कोल्हापूर येथील अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.आलं जर्नालिस्ट व फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटन यांच्या वतीने दिला जाणारा पत्रकारितेतील सर्वोच्च अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पत्रकार प्रेरणा पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध पत्रकारांची निवड  समितीकडून करण्यात आली. हिवरखेड येथील किरण सेदानी हे प्रेस क्लब हिवरखेड चे येथील माजी अध्यक्ष असून , प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत.त्तसेच अनेक सामाजीक . व शैक्षणीक संस्थाशी जुळलेले आहेत यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुद्धा येथे राबविले आहेत. आदीवासी बांधवा सोबत दिवाळी साजरी करणे कपडे व बलँकेट वाटप करणे त्याचप्रमाणे कोरोणा काळामध्ये मास्क वाटप जेवणाची व्यवस्था धान्यवाटप रक्तदान शिबीर कोरोना रुग्नाना मदत तसेय शालेय बाह्य विद्यार्थाना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यानी केले आहे उल्लेखनीय म्हणजे किरण सेदाणी यांच्या नेतृत्वात वॉटर कप स्पर्धेमध्ये विविध गावांना एक महिन्याचे फराळाचे देऊन गाव पातळीवर पाणी आडवा पाणी जिरवा या मिशनसाठी मोठ्या हिरारीने जिद्दीने काम केले आहे त्यामुळे अनेक भागातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी  मदत झाली.यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार जतीन देसाई , जेष्ठ पत्रकार सचीन परब , माहिती व जलसंपर्क विभागाचे उपसंचालक डाँ .संभाजी खरात , संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल , राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कोळी , राष्ट्रीय सरचिटणीस बाळकृष्ण कासार  ,   प्रदेशाध्यक्षा कांचन जांबोटी  , प्रदेश कार्याध्यक्ष नीलेश पोटे  तसेच संघटनेतील ईतर गणमान्य  पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

Previous Post Next Post